https://youtu.be/ajDPZV1hQEU
https://youtu.be/
Monday, 13 January 2020
*मैत्री..* Nakii vachaaa😊😊 अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच अचानक एकमेकांची सवय होवून जाणं😊 म्हणजे.... *मैत्री*... तुमच्या सारखी खूप खूप गुणी... अन् माझ्यासारखी थोड़ी थोड़ी खुळी....जशी कायम बहरलेली सदाफुली... म्हणजे *मैत्री*...!!😊 हसवणाऱ्या, फसवणाऱ्या तर कधी कंटाळवाण्या गप्पा.. म्हणजे.... *मैत्री*.... मनात निर्माण झालेला तुमच्या आठवणींचा कप्पा...😊 म्हणजे.... *मैत्री*...!! मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन् तुमच्या शी बोलताना विसर पडलेला शीण म्हणजे.... *मैत्री*...! अगदीच महागडं सुंदर फुलझाड नसेलही पण दुर्मिळ गवताचं एक नाजुक पातं... म्हणजे.... *मैत्री*.... देवानेही हेवा करावा अन् प्रेमानेही लाजावं असं पवित्र नातं म्हणजे.... *मैत्री*...!! उतरत्या वयाच्या सांजवेळीही ऐकु यावी अशी सुंदर तान आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावं असं पान.... म्हणजे.... *मैत्री*...!! हसता हसता अलगद टीपावं असं डोळ्यातलं पाणी.. अन्... स्वप्नवत वाटणाऱ्या स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची अशी ही कहाणी... म्हणजे.... *मैत्री.......* *कुछ लम्हे गुजारे है,* *मैंने भी अपने खास दोस्तो संग* *लोग उन्हें वक़्त कहते है और* *हम उन्हे जिदगी कहते है* 💓 सर्व मित्र मैत्रिणींना समर्पित ......💓
Subscribe to:
Posts (Atom)