https://youtu.be/ajDPZV1hQEU

https://youtu.be/

Monday, 1 December 2025

*।।मुलीची माया।।* ******************************** एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार.... जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागले तेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार. तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही. आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली... जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली, ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका.. मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन ..... आता तो माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला... आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली, आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. . आशय ...... मुलगी असणारे खुप भाग्यवान आहेत कारण मुली आपल्या आईवडिलांनाच आपली दौलत समजतात ,म्हणुनच मुलगी झाली तर खुश व्हायला हवे ना की दुःखी....... अशी प्रार्थना करा की प्रत्येकाला एक मुलगी मिळावी जी वडिलांना नेहमी स्मरणात ठेवेल. *आपला दिवस आनंदात जावो....*

Wednesday, 13 August 2025

अहिल्याबाई होळकर

 ३१ मे १७२५–१३ ऑगस्ट १७९५). एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.


खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.”


आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरत्यांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.


मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.


अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ⇨ ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.


अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी ⇨ शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.


अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.


अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.


राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्‍वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.


त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या.


जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.


बाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर,मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.


वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्‍वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.


अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्‍वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.


अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली.


अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.


मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते.


महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

Friday, 25 July 2025

shorts forms

 *🙏  हे माहित असु द्या...Educational Short forms- Long forms🙏*

*👉NAS:*- National Achievement Servey (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण)

*👉NIPUN:*- National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy.( 5 जूलै 2021)

*👉STARS:*- Strengthening Teaching-Learning and Results for States.(राज्यातील शिक्षण पध्दतीतील अध्यापन-अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण)

*👉FLN:*-Foundational Literacy and Numeracy ( पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान)

*👉DIET:*- District Institute for Education and Training.(जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था)

*👉NISHTHA:*- National Initiative for School' Heads and Teachers' Holistic Advancement.

*👉PAT (Test):*- Periodic Assessment Test.( नियतकालिक मूल्यांकन चाचणी)

*👉UDISE:*-Unified District Information System for Education.(शिक्षणाकरिता एकरूप जिल्हा माहिती प्रणाली)

*👉SCERT*:- State Council of Educational Research and Training.( राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

*👉NCERT:*- National Council of Educational Research and Training (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

*👉NEP2020*:- National Education Policy 2020( राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020)

*👉LOs:*- Learning Outcomes (अध्ययन निष्पत्ती)

Saturday, 14 September 2024

जशाच तशे ,बोधकथा 2024

 🟧*बोध कथा*🟨

*************************

  🚩🚩*कर्म फळ*🚩🚩

----------------------------------------



  🪴🪴*कथा*🪴🪴


🌺🌺एका गावात एक शेतकरी राहत होता, त्याचे जीवन साधे होते, पण त्याच्या आयुष्यात एक गुंतागुंत होती. त्याला दोन बायका होत्या आणि प्रत्येकीपासून एक मुलगा होता. दोन्ही मुलांचे लग्न झाले होते, आणि शेतकऱ्याला वाटले की त्याचे जीवन आता स्थिर आणि आनंदी झाले आहे. पण वेळेने त्याला एक नवीन आव्हान दिले, जेव्हा त्याच्या लहान मुलाची तब्येत अचानक बिघडू लागली.


🪷🪷मोठ्या भावाने धाकट्या भावावर उपचार व्हावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याने गावातल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, पण त्याच्या धाकट्या भावाच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही. हळूहळू खर्च वाढत गेला आणि धाकट्या भावाची प्रकृती आणखी बिघडली. या चिंतेने मोठ्या भावाच्या मनात हळूहळू कटुतेचे रूप धारण केले.


🌷🌷एके दिवशी मोठ्या भावाने पत्नीशी सल्लामसलत केली. ती म्हणाली, "धाकट्या भावाचा मृत्यू झाला तर त्याच्या उपचारासाठी आम्हाला आणखी पैसे खर्च करावे लागणार नाहीत." त्याचे विचार सांगणाऱ्या त्याच्या पत्नीने एक भयंकर सूचना केली, "वैद्यांचा सल्ला घेऊन त्याला विष का पाजत नाही? कोणाला संशय येणार नाही आणि त्याचा मृत्यू आजारपणामुळे झाला मान्य होईल."


🟦🟦मोठा भाऊ त्याच्या पत्नीशी सहमत झाला आणि त्याने डॉक्टरांशी वैद्याशी संपर्क साधला. तो वैद्याला म्हणाला, "तुमची जी काही फी असेल ती मी द्यायला तयार आहे. माझ्या धाकट्या भावाला एवढं विष द्या की तो मरेल." लोभ आणि क्रूरतेने भरलेल्या वैद्याने हा घृणास्पद प्रस्ताव स्वीकारला आणि धाकट्या भावाला विष पाजले. धाकट्या भावाचा काही दिवसातच मृत्यू झाला.


🟩🟩आता रस्त्यातला काटा निघून गेला आणि सर्व संपत्ती त्यांची झाली या विचाराने मोठा भाऊ आणि त्याची पत्नी अंतर्मनात आनंदित झाले. धाकट्या भावावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि वेळ निघून गेली.


🟪🟥काही महिन्यांनी शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. कुटुंबात आनंदाची लाट आली आणि त्यांनी मोठ्या प्रेमाने मुलाला वाढवले. कालांतराने मुलगा तरुण झाला आणि त्याचे लग्नही मोठ्या थाटामाटात झाले. पण हे आनंदाचे 🌷🌷दिवस फार काळ टिकू शकले नाहीत.


🌸🌸लग्नानंतर काही काळानंतर मोठ्या मुलाची तब्येत अचानक बिघडू लागली. त्याच्या उपचारासाठी त्याच्या पालकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. अनेक वैद्यांचा सल्ला घेण्यात आला आणि जे पैसे मागितले ते द्यायला तयार झाले. त्याने आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी आपली अर्धी मालमत्ता विकली, परंतु त्याची तब्येत सतत खराब होत गेली. आता तो मृत्यूच्या दारात उभा होता, त्याचे शरीर इतके अशक्त झाले होते की त्याची अवस्था पाहून मन हेलावायचे.


💐💐एके दिवशी तो मुलगा खाटेवर झोपला होता आणि त्याचे वडील त्याच्याकडे खिन्न नजरेने बघत होते. मुलगा अचानक वडिलांना म्हणाला, "भाऊ, आमची गणिते आपला हिशोब पूर्ण झाला आहे. आता फक्त कफन आणि लाकडाची व्यवस्था उरली आहे, त्यासाठी तयारी करा."


🚩🚩आपला मुलगा आजारपणामुळे बडबड करत आहे असे वडिलांना वाटले आणि म्हणाले, "बेटा, मी तुझा बाप आहे, तुझा भाऊ नाही."


🟫🟫मुलगा दु:खी स्वरात म्हणाला, "बाबा, मी तुमचा भाऊ आहे, ज्याला तुम्ही विष पाजले होते, ज्या संपत्तीसाठी तुम्ही मला मारले होते, ती संपत्ती आता माझ्या उपचारात अर्धी विकली गेली आहे. आमचा हिशोब बरोबर झाला आहे."


🟨🟨हे ऐकून वडील दु:खी झाले. तो ढसाढसा रडायला लागले आणि म्हणाले, माझ्या कुटुंबाचा नाश झाला आहे."माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. मी जे काही केलं ते माझ्यासमोर आलं आहे. पण या गरीब मुलीला जिवंत जाळण्यात तुझ्या बायकोचा काय दोष?" त्याकाळी सती प्रथा चालू होती, त्यात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पतीच्या चितेसह जाळले जात असे.


🪷🪷मुलाने वडिलांकडे उदास नजरेने पाहिले आणि म्हणाला, "बाबा, मला विष पाजणारा डॉक्टर कुठे आहे?"


🚩🚩वडिलांनी उत्तर दिले, "तुझ्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी त्याचा मृत्यू झाला."


🟩🟩मुलगा कडवटपणे हसला आणि म्हणाला, "तो दुष्ट डॉक्टर आज माझी बायको म्हणून इथे आहे. माझ्या मृत्यूनंतर तिलाही जिवंत जाळले जाईल."


🚩🚩देवाचा न्याय अपरिवर्तनीय आहे असे म्हणतात. 🌸🌸त्या न्यायाची झलक या कथेत आहे. आयुष्यात केलेल्या कर्माचा हिशेब कुठे ना कुठे समोर येतोच.🚩🚩


  🙏🙏*बोध*🙏🙏


🌺🌺☝️  *कथेच्या शेवटी संदेश असा आहे की ☝️🪴तुम्ही जे पेराल तेच उगवेल☝️🪴. सत्य आणि प्रामाणिकपणाने जगणे हाच जीवनातील सर्वात मोठा धर्म आहे.*☝️🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌺🌺🌺🚩🚩🚩🌺🙏🙏☝️म्हणूनच आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असू त्या ठिकाणी  कमीत कमी 80%तरी इमानदारीने  काम करावे .त्यालाच साथ द्यावी. स्वार्थासाठी  ,वैयक्तिक  लोभापायी  खोटया  बाबींचे समर्थन करणे म्हणजे परमेश्वराची भसवणूक करणे आहे.आपण  परमेश्वराला मानणारे असाल तर  त्यांचे फळ आपणाला  भोगावे लागणारच  .कारण त्याच्या दरबारात  अजिबात वशिलेबाजी, चमचेगिरी,  ढोंगीपणा चालत नाही. त्याच्या न्यायालयात वेळ आल्यावरच करेकट्ट   कार्यक्रम न सांगता पूर्ण होतो.म्हणून आपण सर्वांनी  आपल्या मनाचा योग्य कौल घेऊन च  कार्य करावे.☝️☝️☝️☝️🌷🪴🪴🌸

Friday, 31 March 2023

माणुसकीचा झरा

 माणुसकीचा झरा


[Image 68.jpg]

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची सहल 26 मार्च  2023 रोजी अकलूज येथे सकाळी साडेनऊ वाजता पोहोचली. मुलांना भूका लागलेले होत्या ,म्हणून आम्ही नाष्टा करण्यासाठी एका हॉटेलवर उतरलो .त्या हॉटेलवर फक्त खिचडी आणि पुरी भाजी होती. सर्व विद्यार्थ्यांनी पुरीची मागणी केली पण गरम पुऱ्या उपलब्ध नव्हत्या त्या हॉटेल मालकाला आम्ही पुऱ्या बनवून देण्याची विनंती केली त्यांनी ती विनंती मान्य केली आणि पुऱ्या बनवायला सुरुवात केली .पण विद्यार्थ्यांना भूक लागली असल्यामुळे विद्यार्थी चुळबुळ करत होते मला अगोदर कशी पुरी मिळेल यासाठी ते रांग मोडून पुढे पुढे येत होते. ही बाब जवळच थांबलेल्या दोन व्यक्तींनी पाहिली आणि ते हॉटेल मालकाला येऊन म्हणायला लागले या विद्यार्थ्यांना लवकर पुरी द्या पण हॉटेल मालकाचा विलाज नव्हता, कसे बसे अर्ध्या पाऊण तासांमध्ये सर्व विद्यार्थी पुरी खाल्ल्या आणि काही विद्यार्थी डबल खिचडी  पण खाल्ली , नाश्ता करणार होतो पण जेवण झालं, हॉटेल मालकाला बिल विचारलं साडेबाराशे रुपये बिल झालं असं तो म्हणाला ,आम्ही बिल काढून देणार तेवढ्यात ते दोन व्यक्ती समोर आले आणि म्हणाले सर तुम्ही बिल देऊ नका आम्ही एक तास झालं इथं थांबलेलो आहोत ते फक्त तुमचे बिल देण्यासाठी.

आम्ही त्यांना विचारलं तुम्ही का बिल देता?ते आम्हाला सांगितलं मी लहान असताना सुद्धा असाच गरिबीतून वर आलेला आहे दिवसभरातून एक वेळेस सुद्धा जेवण मिळत नव्हतं ती  मला आठवण झाली.  कृपया हा नाष्टा माझ्याकडून स्वीकारा त्यांचा कष्टातलं जीवन वृत्तान ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आलं ,आणि ते सर्व बिल त्या  अकलूज  मधील व्यक्तिने दिला, आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला .एक दोन रुपये साठी लोक भांडण करतात आणि हा ओळख  नसलेला व्यक्ती, काही संबंध नसलेला व्यक्ती ,साडेबाराशे रुपये बिल देतो आमच्या डोळ्आणि ते सर्व बिल त्या  अकलूज  मधील व्यक्तिने दिला, आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला .एक दोन रुपये साठी लोक भांडण करतात आणि हा ओळख  नसलेला व्यक्ती, काही संबंध नसलेला व्यक्ती ,साडेबाराशे रुपये बिल देतो आमच्या डोळ्यात पाणी आलं सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित होऊन त्या व्यक्तीकडे पाहू लागले मी मनामध्ये विचार केला हे लोक आपल्यासाठी बाराशे तेराशे रुपये खर्च करतात तर आपण यांचा हार घालू सत्कार केला पाहिजे, म्हणून आम्ही हार आणून त्यांच्या सत्कार केला पण तो सत्कारही घेण्यास नकार देऊ लागली आणि त्यांना विनंती केली आपण आम्हाला एवढं सहकार्य केलात आमचा हा सत्कार स्वीकारा म्हणजे आम्हालाही समाधान वाटेल ते त्यांनी मानलं आणि सत्कार स्वीकारला, आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना टाटा करून ते निघून गेले.,( ते दोन व्यक्ती वर फोटोत आहेत त्यांचे नाव जाधव सर आहे)

 एके ठिकाणी कवी म्हणतो , गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, त्या कवीला माणूस भेटत नसेल म्हणून तो कवी माणूस शोधत असेल पण आम्हाला अकलूज मध्ये विद्यार्थ्यांना नाश्ता देणारा माणूस मात्र भेटला, जगात आणखीन सत्य, माणुसकी, विश्वास, जिव्हाळा ,आपुलकी ,या गोष्टी आहेत याचा परिचय आम्हाला पुनश्च झाला.  आणखीनहीं  माणसाच्या मनामध्ये माणुसकीचा झरा आहे हे मात्र नक्कीच  

लेखन:

मुर्किकर  सर  , जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हल्लाळी तालुका निलंगा जिल्हा लातूर


र-.

Thursday, 30 March 2023

विश्वास पशुवर की माणसावर सुंदर बोधकथा 2023

 एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. 


त्या दिवशी शिकार काही मिळाली नाही. 


शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्यावर थांबला. 


हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला,


एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला.


 तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांन जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली.


पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली. 


वर अस्वल, खाली वाघ! आता काय करायचं ?


तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय."


माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखाली बसून होता.


 रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. 


हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."


 पण अस्वलानं तसं केलं नाही. 


थोड्या वेळानं माणसाला जाग आली. 


मग अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं ही संधी साधली.


 तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल."


माणसानं क्षणाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला. 


सुदैवाने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते. त्यामुळे ते पडलं नाही. 


पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला.


 ते म्हणालं, 

"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला फसवलंस.


 "पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं."


ध्यानात ठेवा

पाठीत खंजर खुपसुन कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे, हे आपल्या हातात आहे.


ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.


सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणार्या असतात,याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही...


☝🏻☝🏻☝🏻☝🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

विनोदाचा बादशहा चारली चॅप्लिन

 आज तो दिवस आहे...जेव्हा चार्ली चॅप्लिन मरण पावला....त्यामुळे त्यांची 3 हृदयस्पर्शी विधाने आठवण्याचा एक चांगला दिवस: (1) या जगात काहीही शाश्वत नाही, अगदी आपल्या अडचणीही नाही.  (२) मला पावसात चालायला आवडते, कारण माझे अश्रू कोणीही पाहू शकत नाही.  (३) आयुष्यातील सर्वात वाया जाणारा दिवस म्हणजे ज्या दिवसात आपण हसलो नाही.  आयुष्य म्हणजे तुमच्या सोबत जे काही आहे त्याचा आनंद घ्यावा, हसत राहा...!  जर तुम्हाला तणाव वाटत असेल तर स्वत:ला ब्रेक द्या.  थोडा आनंद घ्या.. आईस्क्रीम/चॉकलेट्स/कँडी/केक... का...?  B'Coz...: STRESSED बॅकवर्ड स्पेलिंग म्हणजे DESSERTS...!!  आनंद घ्या...!  खूप सुंदर ओळी कृपया संग्रहित करा.  एक चांगला मित्र हा एका चांगल्या औषधासारखा असतो...!  त्याचप्रमाणे एक चांगला गट म्हणजे एक पूर्ण मेडिकल स्टोअर...!!  जगातील सहा सर्वोत्तम डॉक्टर....: 1.सूर्यप्रकाश, 2.विश्रांती, 3.व्यायाम, 4.आहार, 5.आत्मविश्वास आणि 6.मित्र जीवनाच्या सर्व टप्प्यांवर त्यांची देखभाल करा आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या...!  चंद्र दिसला तर देवाचे सौंदर्य दिसले.....!  सूर्य दिसला तर...!  तुम्हाला देवाची शक्ती दिसते.... आणि.... जर तुम्ही आरसा पाहिला तर तुम्हाला देवाची सर्वोत्तम निर्मिती दिसते...!  तर, स्वतःवर विश्वास ठेवा.  आपण सर्व पर्यटक आहोत आणि देव आपला ट्रॅव्हल एजंट आहे ज्याने आपले सर्व मार्ग, आरक्षणे आणि गंतव्यस्थाने आधीच निश्चित केली आहेत.... त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जीवन नावाच्या "ट्रिप" चा आनंद घ्या...!!  आयुष्य पुन्हा कधीच येणार नाही.!!  आजच जगा..!  तुम्ही हे तुमच्यासाठी महत्वाचे असलेल्या सर्व लोकांना शेअर करू शकता..!!  🙏