माणुसकीचा झरा
[Image 68.jpg]
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची सहल 26 मार्च 2023 रोजी अकलूज येथे सकाळी साडेनऊ वाजता पोहोचली. मुलांना भूका लागलेले होत्या ,म्हणून आम्ही नाष्टा करण्यासाठी एका हॉटेलवर उतरलो .त्या हॉटेलवर फक्त खिचडी आणि पुरी भाजी होती. सर्व विद्यार्थ्यांनी पुरीची मागणी केली पण गरम पुऱ्या उपलब्ध नव्हत्या त्या हॉटेल मालकाला आम्ही पुऱ्या बनवून देण्याची विनंती केली त्यांनी ती विनंती मान्य केली आणि पुऱ्या बनवायला सुरुवात केली .पण विद्यार्थ्यांना भूक लागली असल्यामुळे विद्यार्थी चुळबुळ करत होते मला अगोदर कशी पुरी मिळेल यासाठी ते रांग मोडून पुढे पुढे येत होते. ही बाब जवळच थांबलेल्या दोन व्यक्तींनी पाहिली आणि ते हॉटेल मालकाला येऊन म्हणायला लागले या विद्यार्थ्यांना लवकर पुरी द्या पण हॉटेल मालकाचा विलाज नव्हता, कसे बसे अर्ध्या पाऊण तासांमध्ये सर्व विद्यार्थी पुरी खाल्ल्या आणि काही विद्यार्थी डबल खिचडी पण खाल्ली , नाश्ता करणार होतो पण जेवण झालं, हॉटेल मालकाला बिल विचारलं साडेबाराशे रुपये बिल झालं असं तो म्हणाला ,आम्ही बिल काढून देणार तेवढ्यात ते दोन व्यक्ती समोर आले आणि म्हणाले सर तुम्ही बिल देऊ नका आम्ही एक तास झालं इथं थांबलेलो आहोत ते फक्त तुमचे बिल देण्यासाठी.
आम्ही त्यांना विचारलं तुम्ही का बिल देता?ते आम्हाला सांगितलं मी लहान असताना सुद्धा असाच गरिबीतून वर आलेला आहे दिवसभरातून एक वेळेस सुद्धा जेवण मिळत नव्हतं ती मला आठवण झाली. कृपया हा नाष्टा माझ्याकडून स्वीकारा त्यांचा कष्टातलं जीवन वृत्तान ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आलं ,आणि ते सर्व बिल त्या अकलूज मधील व्यक्तिने दिला, आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला .एक दोन रुपये साठी लोक भांडण करतात आणि हा ओळख नसलेला व्यक्ती, काही संबंध नसलेला व्यक्ती ,साडेबाराशे रुपये बिल देतो आमच्या डोळ्आणि ते सर्व बिल त्या अकलूज मधील व्यक्तिने दिला, आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला .एक दोन रुपये साठी लोक भांडण करतात आणि हा ओळख नसलेला व्यक्ती, काही संबंध नसलेला व्यक्ती ,साडेबाराशे रुपये बिल देतो आमच्या डोळ्यात पाणी आलं सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित होऊन त्या व्यक्तीकडे पाहू लागले मी मनामध्ये विचार केला हे लोक आपल्यासाठी बाराशे तेराशे रुपये खर्च करतात तर आपण यांचा हार घालू सत्कार केला पाहिजे, म्हणून आम्ही हार आणून त्यांच्या सत्कार केला पण तो सत्कारही घेण्यास नकार देऊ लागली आणि त्यांना विनंती केली आपण आम्हाला एवढं सहकार्य केलात आमचा हा सत्कार स्वीकारा म्हणजे आम्हालाही समाधान वाटेल ते त्यांनी मानलं आणि सत्कार स्वीकारला, आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना टाटा करून ते निघून गेले.,( ते दोन व्यक्ती वर फोटोत आहेत त्यांचे नाव जाधव सर आहे)
एके ठिकाणी कवी म्हणतो , गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, त्या कवीला माणूस भेटत नसेल म्हणून तो कवी माणूस शोधत असेल पण आम्हाला अकलूज मध्ये विद्यार्थ्यांना नाश्ता देणारा माणूस मात्र भेटला, जगात आणखीन सत्य, माणुसकी, विश्वास, जिव्हाळा ,आपुलकी ,या गोष्टी आहेत याचा परिचय आम्हाला पुनश्च झाला. आणखीनहीं माणसाच्या मनामध्ये माणुसकीचा झरा आहे हे मात्र नक्कीच
लेखन:
मुर्किकर सर , जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हल्लाळी तालुका निलंगा जिल्हा लातूर
र-.
No comments:
Post a Comment