https://youtu.be/ajDPZV1hQEU

https://youtu.be/

Thursday, 5 March 2020

Marathi bhasha

कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे. आणी तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे.

इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.

__________________
क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.

च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा

ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .
________________________

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

*मराठी बोला अभिमानाने*

No comments:

Post a Comment